औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर. 58 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी.

औरंगाबाद तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर.

58 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी.

औरंगाबाद : तालूक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत मंगळवार, 8 दंडिसेम्बर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, हडको येथे सकाळी 11 वाजता विशेष बैठकीत काढण्यात आली. रश्मी संतुके या पाच वर्षाच्या मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली. 

114 ग्रामपंचायतींपैकी 58 सरपंचपदे महिलांच्या वाट्याला आलेली आहेत तर 20 सरपंचपदे अनुसूचित जातीच्या पुरूष व महिलेसाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिला व पुरूषांसाठी 60 सरपंचपदे वाट्याला आली आहेत.


अनुसूचित जातीसाठी सय्यदपुर, औरंगपुर, कचनेर, कचनेर तांडा, सुलतानपुर, हिरापुर, कच्चीघाटी, जावतपुर, नायगाव, भिकापुर, पटोदा, गंगापुर नेहरी, लामकाना, जयपुर, चौका, चौकावाडी, दरकवाडी, हातमळी, रूस्तमपुर, डोणवाडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा, कौडगाव अंबड, पळशी, टाकळीमाळी, महमदपुर एकलहरा, हुसेनपुर, मलकापुर, लाडसावंगी, भोगलवाडी, बकापुर, गोपाळपुर, सहाजतपुर, करजगाव, हसनाबादवाडी, आडगाव खुर्द, गाडीवाट, गाडीवाट तांडा या गावांची निवड झाली आहे. 

अनुसूचित जाती (महिला) आरक्षणासाठी कचनेर, कचनेरतांडा, जयपुर, लामकाना, लाडसावंगी, भोगलवाडी, टाकळीमाळी, महामदपुर, एकलहरा, हुसेनपुर, मलकापुर, पळशी, सय्यदपुर, औरंगपुर, करजगाव, हसनाबादवाडी, डोणवाडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा, दरकवाडी ही गावे निघाली. अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी तालुक्यातील केसापुरी, रामपुरी, केसापुरी तांडा, आडगाव (बुद्रूक), आपतगाव ही गावे तर अनुसूचित जमाती महिलेसाठी केसापुरी, रामपुरी, रामपुरी तांडा व आपतगाव गावांची निवड झाली आहे.


प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण याप्रमाणे.

औरंगाबाद तालूक्यातील प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण याप्रमाणे राहिले आहे. अनुसूचित जातीसाठी 10 गावे, अनुसूचित जाती ( महिला) साठी 10 गावे, अनुसूचित जमातीसाठी 1, अनुसूचित जमाती (महिला) साठी 2, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी 15, नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)साठी 16, सर्वसाधारणसाठी 30 आणि सर्वसाधारण महिलांसाठी 30 गावांची निवड झाली आहे.
.


Post a comment

0 Comments