जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वादयाचिकेवर 12 जानेवारीला सुनावणी.

जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद
याचिकेवर 12 जानेवारीला सुनावणी.

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी कृष्णा डोणगावकर यांच्या याचिकेवर 12 जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. ही याचिका शुक्रवारी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणीसाठी घेण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी 3 जानेवारी 2020 रोजी निवडणूक झाली होती. निवडणुकीसाठी मतदानही झाले. 
परंतु, मतदानावेळी गोंधळ झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास पालवे यांनी सभा तहकुब केली. ही सभा दुस-या दिवशी झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवार अ‍ॅड. देवयानी डोणगावकर आणि मीना शेळके यांना समसमान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. त्यात मीना शेळके यांनी बाजी मारली होती. त्यामुळे त्यांची निवड घोषित करण्यात आली. या निर्णयाविरोधात अ‍ॅड. डोणगावकर यांनी अ‍ॅड. सिध्देश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. 

त्यात अध्यक्षपदाची निवड खंडपीठाच्या निकालाच्या अधीन राहिल असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर याचिकेवर अनेकदा सुनावण्या झाल्या. याप्रकरणाची आजही सुनावणी झाली. मात्र, आता सुनावणी पुढील सुनावणी 12 जानेवारी 2021 रोजी होण्याची शक्यता आहे.

Post a comment

0 Comments