गेवराई तालुक्यातील 13 तरूणांची भारतीय सैन्य दलात झाली निवड.

गेवराई तालुक्यातील 13 तरूणांची भारतीय सैन्य दलात झाली निवड.
र.भ. अट्टल महाविद्यालयाच्या 10 जणांचा समावेश.


गेवराई : 20 नोव्हें.2020 मध्ये बीड येथे झालेल्या भारतीय सैन्यदल भरती प्रक्रियेमधून बीड जिल्हयातून सर्वाधिक 13 युवकांची गेवराई तालुक्यातून निवड झाली आहे. त्यापैकी 10 विद्यार्थी आर.बी. अट्टल महाविद्यालयाचे आहेत.

आर.बी. अट्टल महाविद्यालयात एन.सी.सी. व क्रीडा विभागाचे विद्यार्थी महाविद्यालयाच्या अद्यावत मैदानावर दररोज सराव करत असते. जिममध्ये व्यायाम करत असत त्याचा फायदा त्यांना झाला. त्यामुळे ते मिल्ट्रीच्या नियमात बसले आणि त्यांची निवड झाली.
आर.बी. अट्टल महाविद्यालयातील भगवान ढाकणे, किशन दराडे, योगेश मुंडे ( सर्व मिरकाळा ), राजकुमार नाकाडे ( गढी ), आकाश सागडे ( भाटेपुरी ), करण मोंढे ( सुशी वडगाव ), मारोती बोरकर ( तळण्याची वाडी ), महादेव राठोड ( कुंभे जळगाव ), उमेश गोरे ( रोहितळ ), गरड संतोष ( चव्हाणवाडी ) या 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर इतर तिघांमध्ये विशाल डोंगरे ( सावरगाव ), महेश काळे ( रोहीतळ ), ऋषिकेश इथापे (कोल्हेर रोड, गेवराई ) यांचा समावेश आहे. 

गेवराई तालुक्यातूम एकाच भरती प्रक्रियेतून तब्बल 13 तरुणांची भरती प्रक्रियेतून यशस्वी निवड होण्याची ही पहिलीच वेळ असावी. यामुळे गेवराई तालुक्यात ठिकठिकाणी या तरूणांची मिरवणूक काढून पेढे वाटून आनंद व्यक्त केला जात आहे. या तरूणांना एन.सी. सी. ऑफिसर मेजर डॉ. विजय सांगळे, क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. सचिन पगारे, प्रा. राजेंद्र बरकसे यांचे मार्गदर्शन लाभले होते. 

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, उपाध्यक्ष माजी आ. अमरसिंह पंडित, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, प्राचार्य डॉ. रजनी शिखरे, उपप्राचार्य डॉ. विजय सांगळे, डॉ. प्रशांत पांगरीकर, प्रबंधक बी.बी. पिंपळे, कार्यालय अधिक्षक भागवत गौंडी यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Post a comment

0 Comments