छावाचा 14 डिसेंबरपासून काटा गेट बंद आंदोलनाचा यांचा इशारा.

घृष्णेश्वर कारखान्याने शेतकर्‍यांची थकित बिले व्याजासह त्वरित द्यावी.
छावाचा 14 डिसेंबरपासून काटा गेट बंद आंदोलनाचा यांचा इशारा.

ढोरकीन - खुलताबाद तालुक्यातील घृष्णेश्वर साखर कारखान्याने ऊसाचे प्रतीटन एफ.आर.पी. रक्कमेबाबत महसुली उत्पन्न 70:30 विभागणीच्या अनुषंगाने कायद्याची अंमलबजावणी करुन सन 2016 ते 2019 पर्यंतच्या कालावधीमधील ऊस ऊत्पादक शेतकर्‍यांना सदरील कालावधीचे पैसे व्याजासह देण्यात यावेत, तसेच चालु वर्षीचा प्रती टन ऊसाचा दर जाहीर करावा. या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, नसता दि.14 डिसेंबर पासून घृष्णेश्वर सहकारी साखर कारखान्याचे काटा गेट बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांनी साखर आयुक्त यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी कोविड-19 या साथरोगामुळे शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. तसेच अतिवृष्टी व अवकाळी वादळी वार्‍यामुळे बहुतांश शेतकर्‍यांचा ऊस शेतातच आडवा झाल्यामुळे शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. 

या दुहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या कठीण परीस्थितीत वावरत असताना घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सन 2016 ते 2019 या कालावधीत कारखान्याला ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अद्याप ऊस बिलाची थकीत रक्कम देण्यात आलेली नाही. यासंदर्भात वारंवार मागणी व आंदोलन करुनही शेतकर्‍यांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचे काम कारखाना प्रशासन करत आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकर्‍यांना त्यांची थकीत रक्कम मिळणे खुपच गरजेचे आहे. 

आर्थिक परिस्थितीमुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. कारखान्याने ऊसाचे प्रतीटन एफ.आर.पी.रकमे बाबत महसुली उत्पन्न 70:30 विभागणीच्या अनुषंगाने कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. 

या कायद्याचे उल्लंघन करुन शेतकर्‍यांची आर्थिक फसवणुक केलेली आहे. ऊसाचे प्रतीटन एफ.आर.पी. रकमेबाबत महसुली उत्पन्न 70:30 विभागणी च्या अनुषंगाने कायद्याची अंमलबजावणी करुन सन 2016 ते 2019 पर्यंतच्या कालावधीमधील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सदरील कालावधीचे पैसे व्याजासह देण्यात यावेत. तसेच चालु वर्षांचा प्रती टन ऊसाचा दर जाहीर करावा जेणेकरून ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा या फसवणूकीला बळी पडणार नाहीत. 

असे साखर आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करुन शेतकरी हिताचा योग्य तो निर्णय घ्यावा, नसता येणार्‍या दि.14 डिसेंबरपासून घृष्णेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या काटा गेट समोर काटा गेट बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांनी सहकार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

Post a comment

0 Comments