अभिजित बांगर यांनी ८ डिसेंबरला पालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट दिली होती. या पाहणीमध्ये हजेरीपत्रक तपासताना आयुक्तांना वैद्यकीय अधिकारी हजेरीपत्रकावर अनुपस्थित असल्याचे आढळून आले. बांगर यांनी गांभीर्याने दखल घेत बांगर यांनी १८ ऑनकॉल मेडिकल ऑफिसर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डॉक्टरांची हजेरी आणि इतर जबाबदारी असलेले वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य विभागाच्या कामकाजावर नियंत्रण असणारे वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
0 Comments