राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीसोबत तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीसोबत तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अशा परिस्थितीत आणखी थंडीचा कडाका वाढणार आहे. बंगालच्या उपसागरातील बुरेवी वादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाल्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार आहे.
राज्यात हिवाळ्याची चाहुल, आजचे किमान तापमान, 6 डिसेंबर.
NASIK 10.1℃
PARBHANI 10.8°C
PARBHANI AGRI UNIV 8.5°C
PUNE 10.4°C
SANTACRUZ 18.4°C
BARAMATI 11.4°C
AURANGABAD 12.2°C
BEED 11.9°C
JALNA 12.3°C
AKOLA 12.7°C
NAGPUR 12.9°C
अन्य बऱ्याच ठिकाणी तापमान 15 अंशाच्या खाली.
मिळालेल्या माहितीनुसार, निवारी राज्यात सगळ्यात कमी किमान तापमान 10.5 अंश शेल्सिअस गोंदियात नोंदवण्यात आले आहे. तर नागपुरात किमान तापमान 12 अंश सेल्शिअसवर पोहोचले आहे. दरम्यान, बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानावर मोठा परिणाम झाला आहे. या चक्रीवादळाने उत्तरेकडून बाष्प ओढून घेतल्याने अनेक भागात थंडी वाढली आहे.
मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत थंड वाऱ्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाले आहे. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत थंडी वाढली आहे. इतकंच नाही तर पुढच्या 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळाली आहे.
काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
0 Comments