सोलापूरात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू.

सोलापूरात बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू.

बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्पशूटर दाखल.

सोलापूर - बिबट्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी कामगाराच्या 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात ही घटना घडलीये. बिबट्याला ठार मारण्यासाठी वनविभागाने आदेश दिले होते. त्यानंतर त्या ठिकाणी बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी शार्पशूटर दाखल झालेत. 
परंतु शार्पशूटर गावात दाखल होण्यापूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. आज पहाटे बिबट्या गावात आल्याचे गावकऱ्यांना समजले होते. गावातील एका गावकऱ्याच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु होते. त्यावेळी ८ वर्षांची मुलगी शेतात खेळत होती. त्याचवेळी बिबट्याने संधी साधून ८ वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला केला. त्यानंतर बिबट्याला मारण्यासाठी गावकरी धावत गेले. 

लोकांचा जमाव पाहून बिबट्याने पळ काढला. यासंदर्भात वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. गावकऱ्यांना तिथून बाजूला जाण्यास सांगून वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. 

वनविभागाची जवळपास 100 कर्मचाऱ्यांचे पथक या गावात दाखल झाले आहे. या पथकामध्ये शार्पशूटरचाही सामावेश आहे. बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. परंतु या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला होता. या बिबट्याने मागील ४ दिवसांत ३ बळी घेतले आहेत. त्यामुळे आता बिबट्याला जेरबंद करण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.

Post a comment

0 Comments