मराठा आरक्षणासाठी ५ वकिलांची समन्वय समिती जाहीर, 9 डिसेंबरला सुनावणी.

मराठा आरक्षणासाठी ५ वकिलांची समन्वय समिती जाहीर, 9 डिसेंबरला सुनावणी.

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टि्वट करून या ५ वकिलांची समन्वय समिती जाहीर केली.

मुंबई - एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीबाबत 5 सदस्यीय घटनापीठासमोर 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून ५ वकिलांची टीम तयार केली आहे. 

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टि्वट करून या ५ वकिलांची समन्वय समिती जाहीर केली आहे. 'एसईबीसी आरक्षण प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने ५ वकिलांची समन्वय समिती जाहीर करण्यात येत आहे. या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. 

अभिजीत पाटील यांचा समावेश आहे,' असे अशोक चव्हाणांनी सांगितले आहे. 'येत्या 9 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. 
ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल, असे अशोक चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारकडून 20 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर तातडीने सुनावणी करण्याच्या मागणीसाठी चार अर्ज केले होते. यातील पहिला अर्ज 7 तर दुसरा अर्ज 28 ऑक्टोबर आणि तिसरा अर्ज 2 नोव्हेंबर तर चौथा अर्ज 18 नोव्हेंबरला केला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. 

त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्यशासनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती राज्य शासनाचे वरिष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती.

Post a comment

0 Comments