माती उखन्नाच्या नावाखाली किमती झाडांचे कत्तल

माती उखन्नाच्या नावाखाली किमती झाडांचे कत्तल 

रायगड :  माणगाव तालुका हा निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे, या तालुक्याला लाभलेला निसर्ग सौंदर्य दिवसो ने दिवस नष्ट होताना दिसत आहे,  माती उत्खननाचा काम जोरदार सुरू असून शासनाची परवानगी घेऊन काही डोंगर पोखरून मुंबई गोवा महामार्गाच्या रस्ता भरावासाठी  व इतर भरावांसाठी माती उत्खनांचे काम सुरू आहेत.
सावित्री नदी लगत महाड माणगाव व म्हसळा अश्या तीन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या विशाल डोंगरात सागवान खैर व अनेक प्रकारचे अनेक किमती झाडा आहेत, तरी या डोंगराच्या कडेला असलेल्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव नजीक भांडीवली येथे डोंगराला पोखरून मातीचे उत्खनन होत आहे. 
भांडीवली येथे उत्खनन होत असलेली जमीन पोखरून सागवान व इतर झाडांना मुळातून काढून झाडांचे बिनधास्तपणे कत्तल करण्यात येत आहे. वन अधिकारी व कर्मचारी मात्र झाडांच्या होणाऱ्या कत्तला कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहेत.

Post a comment

0 Comments