औरंगाबाद मध्येभीषण अपघात!! एक जण जागीच ठार.

औरंगाबाद, दि. २२ डिसेंबर : औरंगाबादकडून जालन्याला निघालेल्या भरधाव एसटी बसने सिडको चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचालक शुभम शिंदे यात गंभीर जखमी झाला आहे. तर मयताची अद्याप माहिती मिळाली नाही. आज दुपारी १२ वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. अपघातात एसटी बसमधील १० ते १२ प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आहे.

बस औरंगाबादकडून जालन्याला जात होती. बस सिडको चौकातील सिग्नल येथे आली असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पाठीमागून दुचाकीला धडकली. ट्राफिकमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीच्या समोरूनही एक बस उभी होती त्यामुळे दोन्ही बसच्यामध्ये चेंगरून हा अपघात झाला आहे. जखमींना बसमधून बाहेर काढून रूग्णालयात हलवलं आहे. दुचाकीस्वार दोघेही बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे
एक तास झाला रुग्णवाहिका आलीच नाही!!!
अपघात झाल्यानंतर काही मिनिटात सिडको स्थानकाजवळ असलेल्या हॉटेल मालक एकनाथ गोपाल यांनी रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र रुग्णवाहिका लवकर येत नसल्याने जखमी व मयताला रिक्षातून रुग्णालयात हलविण्यात आले. गोपाल यांनी दिलेल्या माहिती नुसार, अपघात होऊन एक तास उलटला तरीसुद्धा रुग्णवाहिका आलेली नाही.

Post a comment

0 Comments