ठाकरे सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.

राज्य सरकार चर्चेपासून पळ काढतंय - देवेंद्र फडणवीस यांची टीका.
ठाकरे सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. फडणवीस म्हणले, राज्यात शेतकऱ्यांच्या समस्य आहे. 

मराठा आरक्षणाचा विषय गाजतो आहे. महिला अत्याचारांच्या वाढणाऱ्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली आहे. 
मात्र, राज्य सरकारने आमची मागणी अमान्य करत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, ठाकरे सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे शेतकऱ्यांवर प्रचंड संकट ओढावले आहे. 

अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला खडसावले आहेत, असे असताना फक्त विधान मंडळात याबाबत चर्चा होऊ शकते. परंतु सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, असे आमच मत आहे, असे फडणवीस म्हणाले.

विधीमंडळाचे अधिवेशन सरकार पुढे ढकलतये : 

सरकारमध्ये विधीमंडळाचे अधिवेशन सातत्याने पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्ताही केवळ दोन दिवसांचे १४ व १५ डिसेंबर रोजी अधिवेशन ठेवण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments