भडकल गेट येथे विविध संस्था, संघटनांचे अनुयायी डॉ. आंबेडकरचरणी नतमस्तक.

महामानवास घरोघरी विनम्र अभिवादन.
भडकल गेट येथे विविध संस्था, संघटनांचे अनुयायी डॉ. आंबेडकरचरणी नतमस्तक.

औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी दि.6 शहरातील विविध संस्था, संघटनांनी भडकल गेट येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिटन्सिंगसह नियमांचे पालन करत अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. दरम्यान पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यासह विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळयाला विनम्र अभिवादन केले.
दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी उसळते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता प्रत्येक अनुयायांनी आपापल्या घरातूनच बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करावे, असे आवाहन प्र्रशासनासह ज्येष्ठ समाजबांधवांनी केले होते. त्यानुसार रविवारी पहाटे शहरातील विविध वसाहतीतील अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

भडकलगेट या ठिकाणी अनुयायांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस बंदोस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्याच्यासमवेत माजी पोलीस निरीक्षक दौलतराव मोरे, विजय मगरे,पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, गुन्हेशाखा तथा वाहतुक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, पोलीस निरीक्षक एस. एस. सानप, सहायक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, जयेश मोरे, अ‍ॅड. हेमंत मोरे आदिची प्रमुख उपस्थिती होती.

विविध संस्था, संघटनांकडून अभिवादन.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मिलिंद शेळके, बाबूराव कदम, रवि जावळे, लक्ष्मण हिवराळे, बाळकृष्ण इंगळे आदींनी अभिवादन केले. भीमशक्ती संघटनेच्या वतीने बाबूराव वाकेकर, शांतीलाल गायकवाड, मिलिंद कोटके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी अभिवादन केले. भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे, शांतीलाल दाभाडे, प्रमोद पवार, अशोक कांबळे यांच्यासह भारतीय बौध्द महासभेच्या पदाधिकार्‍यांनी बाबासाहेबांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कॉग्रेस अनुसूचित विभाग.
भटकल गेट येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कृती पुतळ्यास औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पवन डोंगरे ,डॉ. संदीप जाधव, इंटक अध्यक्ष एड इक्बाल सिंग गिल, संतोष भिंगारे, वैशाली तायडे, संजीवनी महापुरे, शकुंतला साबळे, प्रा. शीलवंत गोपनारायण, सुनील साळवे,
अ‍ॅड. संजय पगारे आदींची उपस्थिती होती.

ऑल इंडिया पॅथर सेना.
ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल मकासरे यांनी बाबासाहेबांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी विशाल नवगीरे, अशरफ शेख, किरण तपे, उमेश निकम, सचिन तिवारी ज्योती जूमडे, प्रथम कांबळे, शुभम मगरे, रोहित साळवे, आदित्य रगडे, भैय्या नवतूरे,मार्शल शिंदे आकाश जंगले,पवन चव्हान, कमलेश दाभाडे,अक्षय दाभाडे, दिपक अंगारखे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

भीमनगरातही अभिवादन.
भीमनगर भावसिंगपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदरचा कार्यक्रम बाबा तायडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. यावेळी या परिसरातील नागरीक,महीला व युवक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.यावेळी पप्पु सरकाळे,दिपक वानखडे, किशोर आरक,डॉ. टेकाळे, दिलीप इंगळे, सिमाताई गाकवाड, नंदाताई वानखडे, सुदामती आंबेवाडीकर, सचिन सावित्रे, संतोष भांडे, दामोधर साळवे, किशोर आरक, राजू ढवळे, आबा गायकवाड, संतोष जाधव, गौतम गवई, महेंद्र गायकवाड,बाँबी अंबेवाडीकर, आंनद सावंग,राजु ढवळे,आदी उपस्थित होते.

दलित कोब्रा, राष्ट्रवादी काँग्रेस.
महापरिनिर्वाण दिना निमित्त भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला भारतीय दलित कोब्रा संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अशोक बोर्डे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी संघटनेचे बाबासाहेब आस्वार, विजय प्रधान, आनंद बोर्डे, अर्जुन गवळे, अभय चव्हाण,विनोद गडकर,आनंद प्रधान, सुमित्रा खंडारे, उषा वैष्णव, मंगल आव्हाड यांच्यासह घटनेचे पदाधिकारी -कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. राष्टलवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उध्दव बनसोडे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शालिकराम दांडगे, निशाताई पाटिल, जितेंद्र भवरे, मुकेश मकासरे, प्रभू कटारे, संजय तुपे, सिमा बचुटे, मिना अवचरमल, कल्पना वाघमारे, स्वाती खिल्लारे, आशा शिरारे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सेना, काँग्रेस पक्ष.
महाराष्ट्र सेनेच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 महापरिनिर्वाण दिना निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पक्षप्रमुख राजूभाई साबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.या वेळी अ‍ॅड. अविनाश थिट्टे, प्रदिप इंगोले, प्रकाश इंगळे, कल्पना जमधडे, डॉ.वसंत लांडगे,अंकूश राठोड,राजेंद्र पोळ, डॉ.रुग्वेश्वर शिरसाट,डॉ.सतीश शिरसाठ,डॉ.अविनाश वेदे,दिगंबर पवार,शुभम गोमटे,वजीर पठाण यांची उपस्थिति होती. भारतीय कॉगे्रस पक्षाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष मोहम्मद हिमाश उस्मानी, चंद्रभान पारखे, डॉ. अरूण शिरसाट,अ‍ॅड. सुभाष देवकर,अनिल धवाणे, शेख अस्लम, किशोर सरवदे आदि उपस्थित होते.

सत्यवादी रिपब्लिकन पॉवर संघटना
सत्यवादी रिपब्लिकन पॉवर संघटनेचे अध्यक्ष शब्बु लखपती यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शेख रब्बानीभाई, सुनील खरात, जयनाथ बोरडे, अनिल निकम, आनंद मगरे, रामचंद्र गोरमे, उत्तम उने, संजय भिसे, सुरेश गुदनैये, शेख सज्जाद, गणेश गवरैये, मोहसीन शहा, गोकुळ गौरैये आदिची प्रमुख उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments