भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरलेलं असतानाच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं सडेतोड उत्तर

मुंबई: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरलेलं असतानाच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं. मी ओपन चर्चा करायला तयार आहे. शिवाजी पार्कवर चर्चा होऊनच जाऊ द्या, असं आव्हान देतानाच ओबीसी समाज भाजपपासून दूर जात असल्याने त्यांना ओबीसींची कळवळा आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 
एकूण 50 कोटींचं बजेट आहे. त्यातील 15 कोटी महाज्योतीसाठी पडून आहेत. तीनशे कोटी सप्लीमेंटमध्ये घेण्याचं मान्य करण्यात आलंय. 200 कोटींची तरतूद महाज्योतीसाठी होणार आहे. भाजप सरकारने जाता जाता केवळ 60 कोटी रुपये ओबीसींना दिले. माझं चॅलेंज आहे. त्यांनी सिद्ध करावं. केंद्र सरकारने ओबीसींच्या स्कॉलरशीपसाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. आठ जिल्ह्यातील आरक्षण कमी झालं होतं. ते का नाही देण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला.

Post a comment

0 Comments