माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे निधन


मुंबई, दि.९ बुधवार : माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सावरा यांचे बुधवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.सावरा यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू होता. दीर्घकाळापासून ते आजारी होते, अखरे बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान त्यांची रुग्णालयात प्राणज्योत माळवली. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी एक वाजता त्यांचे वाडा येथील निवासस्थानाहून निघणार आहे.

Post a comment

0 Comments