महापालिकेच्या विविध विकास कामाचे लवकरच होईल भूमिपूजन.

औरंगाबाद : पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिका शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांपर्यंतची ही विकास कामे आहेत. बहुचर्चित नवीन पाणी पुरवठा योजनेला शासनाकडून अंतिम मंजुरी मिळताच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा होणार आहे. 
शहराचा पाणी प्रश्न  सोडविण्यासाठी तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारने १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. त्यानंतर योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर  सोपविले.   प्राधिकरणाने अल्पावधीत कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. आता अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे फाईल प्रलंबित आहे. 

Post a comment

0 Comments