कृषी कायद्यावरून महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.

कृषी कायद्यावरून महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

फडणवीस यांनी शरद पवार यांनी २०१० मध्ये लिहिलेल्या पत्राचे उदाहरण दिले आहे. शरद पवार यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पञ पाठवले होते. या पञात त्यांनी एपीएमसी कायद्यात बदल करण्याची गरज आहे हे उदाहरण शरद पवार यांनी दिले होते. 
ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी लिहिलेले पत्र देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवले. शरद पवार यांच्या आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्येही शेतकऱ्यांबाबतचे जे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे, ते फडणवीस यांनी वाचून दाखवले आहे. दरवर्षी देशात ५५ हजार कोटींचा शेतमाल वाया जातो. ही मोठी हानी आहे. 

शेतमाल हा फक्त एपीएमसीमध्येच विकला गेला पाहिजे हा नियम आता बदलला जावा, अशी मागणी शरद पवार यांच्या आत्मचरित्रात आहे, असे फडणवीस म्हणाले आहे.

विरोधाला विरोध म्हणून विरोधक विरोध दर्शवताय:- शिवसेनेने फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्यासाठी समर्थन दिले होते. आजही ते नियमन मुक्त आहे, असे फडणवीस म्हणाले आहे. एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय कसा होतो आणि काय मार्ग काढला पाहिजे हे खासदार विनायक राऊत यांनी चर्चा केली आहे. आता विरोधाला विरोध म्हणून विरोधक विरोध दर्शवत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे. जे जे पक्ष भारत बंदला पाठिंबा देत आहेत ते बहती गंगामें हात धोना या म्हणीला अनुसरुन वागत आहे, असे फडणवीस म्हणाले आहे.

Post a comment

0 Comments