प्रसाद कोहिनकर बनला सैन्यदलात लेफ्टनंट; पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

पुणे : लष्कराच्या दोन प्रशिक्षण संस्थेतून तब्बल चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करत पुण्यातील दोन तरुण लष्करातील सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आहेत. डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ऍकॅडमीच्या (आयएमए) १४७ व्या तुकडीचा दीक्षांत संचालन सोहळा नुकताच संपन्न झाला असून प्रसाद कोहिनकर आणि अनिकेत साठे यांच्या यशाने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 
प्रसाद आणि अनिकेत या दोघांचाही लष्करात दाखल होण्याचा प्रवास राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मधून झाला. तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करत दोघांनीही सैन्यदलात जाण्यासाठी आयएमए या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळविला. येथे एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. दोघेही आपापल्या कुटुंबातील पहिले सदस्य आहेत, ज्यांनी लष्करात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.

Post a comment

0 Comments