कोल्हापूरला परत जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं

पुणे :  कोल्हापूरला परत जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी लगावला. “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, तुम्हाला बोलावलंय कुणी..??”, अशा खास पुणेरी स्टाईल कोपरखळ्या अजित पवार यांनी फडणवीस  आणि चंद्रकांत पाटील  यांना लगावल्या. 
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. ‘पुन्हा येईन, परत जाईन’ अशी भाषा करणाऱ्यांना जनतेने बोलावलंच नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असा टोला अजित पवार यांनी लगावला

Post a comment

0 Comments