शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी बंद पाळावाशिवसेना नेते सजंय राऊत यांचे आवाहन.

शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी बंद पाळावा
शिवसेना नेते सजंय राऊत यांचे आवाहन.

मुंबई : केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चांगलेच पेटले आहे. शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली असून या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. हा कोणताही राजकीय बंद नाही. 

एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना नेते सजंय राऊत यांनी केले आहे. सजंय राऊत यावर बोलताना म्हणाले की, आमचे तीन पक्ष इथे एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळा आहे. या बंदला महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती, असे राऊत म्हणाले. शेतकरी संकटातही शेतात राबतो. आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले असताना त्याने आपल्याला साथ दिली. आज त्याला आपली गरज असेल, तर त्याला साथ द्या, असे राऊत म्हणाले.

शरद पवार कृषी क्षेत्रातील तज्ञ : मागील 10-12 दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कडाक्याच्या थंडीत आंदोलनाला बसला आहे. 2010 ची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांना विचारा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी क्षेत्रातील तज्ञ समजले जातात, असे राऊत म्हणाले.

Post a comment

0 Comments