भारत बंदला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद. ठाण्यात चक्काजाम आंदोलन, औरंगाबादेतील बाजरपेठा कडकडीत बंद.

भारत बंदला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद.

ठाण्यात चक्काजाम आंदोलन, औरंगाबादेतील बाजरपेठा कडकडीत बंद.

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या तिन कृषी कायद्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आज मंगळवारी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 
शेतकऱ्यांच्या भारत बंदला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहे.

लासलगाव बाजार समितीत शुकशुकाट : भारत बंदमध्ये लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहेत. लासलगावसह बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट, कोट्यवधीचे व्यवहार ठप्प आहे.

कराड शहरातील बाजारपेठ बंद : शेतकरी भारत बंदला कराड येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा शेतीमाल खरेदी-विक्रीसह भाजीपाला धान्य मार्केट बंद ठेऊन कडकडीत पाळण्यात आला आहे. कराड शहरातील व्यापारी दुकानदारांचाही संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

औरंगाबाद शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद : औरंगाबाद शहरातील बाजारपेठा सकाळपासूनच कडकडीत बंद आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. औरंगाबाद शहरातील गुलमंडी, पैठण गेट, निराला बाजार आणि कॅनॉट प्लेस कडकडीत बंद, शेतकऱ्यांच्या भारत बंदला व्यापारी आणि व्यावसायिकांचा कडक प्रतिसाद दिला आहे.

वसई विरार नालासोपाऱ्यात दुकाने बंद : वसई विरार नालासोपाऱ्यात सकाळ पासूनच भारत बंदला पाठिंबा दर्शवीला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, रिक्षा आणि खाजगी वाहनांची वाहतूक सुरु आहे.

नंदुरबारमध्ये सहा बाजार समितीचे व्यवहार ठप्प : भारत बंदमध्ये नंदुरबार ग्रामीण भागाने सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील 6 बाजार समितीचे व्यवहार ठप्प आहेत. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील सर्वात मोठी भाजीपाला मार्केट असलेल्या नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मार्केटही बंद आहे.

पुणे बंगळुरु महामार्गावर वाहतूक मंदावली : 
भारत बंदचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम दिसून येत आहे. पुणे बंगळुरु महामार्गावर वाहतूक मंदावली आहे. अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहने वगळता किरकोळ खाजगी वाहने रस्त्यावर आहेत. भारत बंदमुळे जिल्ह्यातील तीनही प्रमुख एमआयडीसीमधील बहुतांशी व्यवहार बंद आहेत.

कल्याण एपीएमसी मार्केट बंद : भारत बंदला कल्याणमधील काही सामाजिक संघटना, रिक्षा टॅक्सी संघटना, एपीएमसी व्यापाऱ्यांचा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, कल्याण एपीएमसी मार्केट बंद आहे. शहरात सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे.

नाशिककर सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर : नाशिकरांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. भारत बंदला प्रतिसाद देण्यासाठी नाशिकमध्ये सर्वपक्षीय संघटना रस्त्यावर उतरणार आहे. 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी बंदला उस्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी सर्वपक्षीय संघटनांचं आवाहन केले आहे.

रत्नागिरीत भारत बंदला अल्प प्रतिसाद : रत्नागिरीत भारत बंदला अल्प प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. कृषी कायद्या विरोधातल्या भारत बंदला शिवसेनेचा पाठिंबा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच व्यवहार सकाळपासून सुरळीत सुरू आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरही बंदचा कुठलाच परिणाम नाही.

बुलडाण्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली : 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाण्यातील मलकापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलन सुरू केले आहे. सरकार विरोधात घोषणबाजी देत आहे. 

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नवजीवन एक्स्प्रेस रोखली असून रेल्वे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आहे. नागपुरातमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 11 वाजता धान्य व्यापाऱ्यांची रॅली : नागपुरातील कळमना भाजीपाला मार्केट सुरू आहेत. काही शेतकरी भाजीपाला घेऊन बाजारात आले आहे. 
भाजीपाल्याच्या विक्रीला व्यापाऱ्यांचाही प्रतिसाद आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी कळमना धान्य मार्केट बंद आहे. धान्य मार्केटमध्ये लिलाव होणार नाही. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ 11 वाजता धान्य व्यापाऱ्यांची रॅली निघणार आहे.

सोलापुरात व्यापार लिलाव बंद : भारत बंदच्या समर्थनार्थ भुसार-आडत व्यापार लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. 

संवेदनशील मार्गावरील एसटी सेवा बंद ठेवण्याचा एसटी प्रशासनाने निर्णय घेतला आहे. लाल बावटा रिक्षाचालक संघटनेचा रिक्षा वाहतूक बंद ठेवली आहे. शहरातील सर्व 14 विडी कारखाने बंद ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट भारत बंदमध्ये सहभागी झाले आहे. एपीएमसी बाजारात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा पूर्ण बंद आहेत. 

नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामगारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

Post a comment

0 Comments