सिलेंडर स्फोटात थोडक्यात वाचली नवरी

मुंबई : मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटामध्ये तब्बल १३ स्थानिक आगीत होरपळून जखमी झाले. यामध्ये एका कुटुंबावर गंभीर परिस्थिती ओढावल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नघाई सुरू असलेल्या घरातील वडील आणि मुलगा आगीत ५० टक्के भाजल्याचं समोर आलं आहे तर नवरी मुलगी आणि तिची आई सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 

Post a comment

0 Comments