सांगा पप्पा केव्हा येतील”, शहिदाच्या चिमुकल्यांना कसं उत्तर देणार?

चाळीसगाव : जम्मू-काश्मिरात शहीद झालेले अमित साहेब राव पाटील  या जवानावर आज त्यांच्या मूळ गावी अत्यसंसार होणार आहेत. त्यांच्या मृत्यूने पाटील कुटुंबासह संपू्र्ण वाकडी गावावर शोककळा पसरली आहे. मात्र, सगळे का दु:खी आहेत, का रडत आहेत हे न समजणारी अमित यांची चिमुकली मुलं त्यांच्या बाबांची आतुरतेने वाट पाहात आहेत. “काका सांगा ना पप्पा कधी येतील”, असा प्रश्न ते वारंवार विचारत आहेत. मात्र, या चिमुकल्यांना कसं आणि कुणी समजवावं की तुमचे पप्पा आता कधीच येणार नाहीत.
 शहीद जवान अमित पाटील यांना भुपेश आणि श्रुती नावाची दोन लहान मुलं आहेत. ही मुलं सतत आपल्या काकांना विचारत आहेत, “काका सांगा ना पप्पा कधी येतील?”, काका मात्र या चिमुकल्यांच्या प्रश्नावर अबोल आहेत. काय उत्तर द्यावं, आसावा पलीकडे काहीही उरलं नाही, त्यांना काय सांगणार?, अशी अवस्था सध्या अमित पाटील यांच्या कुटुंबियांची झाली आहे.
वाकडी येथील त्यांच्या घरी पोहचले आहे. चाळीसगाव ते वाकडी दरम्यान त्यांची भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’, अशा घोषणा तरुणांनी दिल्या. सध्या त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे .

Post a comment

0 Comments