शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्त्वाची बातमी. शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने ड्रेसकोडचे निर्देश जाहीर केले आहेत. यामध्ये गडद आणि चित्रविचित्र कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच नक्षीकाम असलेले कपडे, जीन्स  आणि टीशर्ट घालून सरकारी ऑफिसमध्ये येण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून चाांगल्या प्रतीच्या वर्तणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची सर्वसामान्य नागरिक अपेक्षा करतात. अशात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय किंवा गबाळी असल्यास त्याचा परिणाम एकंदर कामकाजावर देखील होतो. म्हणूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दैनंदिन पेहराव कसा असावा याबाबत सरकारकडून आता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  

Post a comment

0 Comments