शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या (सोमवार) एका दिवसाचा उपवास करणार - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या (सोमवार) एका दिवसाचा उपवास करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना उद्याचा दिवस उपवास करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
"देशातील अनेक खेळाडूंनी शेतकऱ्यांचं समर्थन केलं आहे. मग ते देशद्रोही झाले का? देशातील वकील, व्यापारी देशद्रोही आहेत का? अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी काँग्रेस सरकारकडून बदनामी केली जात होती. आता भाजपकडून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे", असं केजरीवाल म्हणाले. ते डिजिटल कॉन्फ्रेन्समध्ये बोलत होते. 
देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही संबोधण्याची घोडचूक कुणी करू नये, असं रोखठोक मत केजरीवाल यांनी व्यक्त केलं. काही मोजके शेतकरी या आंदोलनात असतील असं समजण्याची चूक सरकारने करू नये. देशातील प्रत्येक नागरिक शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या एक दिवसाचा उपवास ठेवावा, असंही केजरीवाल म्हणाले.

Post a comment

0 Comments