शेतकऱ्यांसाठी एफआयआर काय फाशीदेखील द्यायची असेल तर द्या. तेजस्वी यादवाचं बिहार सरकारला खुल 'चॅलेज'

शेतकऱ्यांसाठी एफआयआर काय फाशीदेखील द्यायची असेल तर द्या.

तेजस्वी यादवाचं बिहार सरकारला खुल 'चॅलेज'

पाटणा : दिल्लीच्या सिमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन बिहारमधील राजकारण चांगलं पेटलं आहे. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आंदोलन पुकारलं असल्यामुळे त्यांच्याविरोधात बिहार सरकारने एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे, तेजस्वी यादव नितीश कुमार सरकारवर चांगलेच भडकले आहे. 

तुमच्यात हिम्मत असेल तर अटक करुन दाखवा असं खुलं 'चॅलेज' बिहार सरकारला तेजस्वी यादव यांनी केलं आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार सरकारवर टि्वटद्वारे हल्लाबोल केला आहे. नितीश कुमार सरकारमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी अटक करुन दाखवा, असे आव्हान तेजस्वी यादव यांनी केलं आहे.

तेजस्वी यादव टि्वटमध्ये म्हणाले आहे की, घाबरट मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल आमच्याविरोधात एफआयआर दाखल केला. तुमच्यात दम असेल तर मला अटक करा. मी वाट पाहिन. नाही केलं तर मी स्वत: हून अटक होईन. शेतकऱ्यांसाठी एफआयआर काय फाशीदेखील द्यायची असेल तर द्या, अशी घणाघाती टीका तेजस्वी यादव यांनी बिहार सरकारव केली आहे.

Post a comment

0 Comments