१० वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला फडणवीसांवर टीका-संजय राऊत

मुंबई - देशभरात बंदला चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी आहेत. सरकारने मनं मोठं करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी आजचं बोलावं, गेल्या १० वर्षांपूर्वीचं बोलू नये. आपण काय बोलतोय, याचा १० वेळा विचार करावा, असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे. 
बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे समर्थन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच केले. आघाडी सरकारच्या काळातच त्यासाठीचे कायदेही झाले. आता त्यांच्याकडून होत असलेला विरोध हा निव्वळ दुटप्पीपणा असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली होती. त्यात, शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता, आजचं बोला असे म्हणत त्यांनी फडणवीसांनाच टोला लगावला. 

Post a comment

0 Comments