तरुणांनी शेतीमध्ये व्यावसायिकता आणण्याची गरज: भगत.

तरुणांनी शेतीमध्ये व्यावसायिकता आणण्याची गरज: भगत.

बनसारोळा येथे जय जिजाऊ ग्रो प्रोड्युसर कंपनी लि संचलित सोयाबीन खरेदी केंद्राचे रविवार रोजी उद्घाटन झाले.

केज - शेती उत्पादनासाठी प्रशिक्षण ,मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.शेतीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास तरुणांना संधी निर्माण होतील कृषि विभाग नेहमी शेतकर्‍यांना सहकार्य करील, असे मत तालुका कृषी अधिकारी जे. बी. भगत यांनी व्यक्त केले. 
तालुक्यातील बनसारोळा येथे जय जिजाऊ ग्रो प्रोड्युसर कंपनी लि संचलित सोयाबीन खरेदी केंद्राचे रविवार रोजी उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक भागवत गोरे, प्रमुख उपस्थिती तालुका कृषी अधिकारी जे. बी. भगत, प्राचार्य डॉ बाबासाहेब गोरे, नाना गुरुजी, प्राचार्य एच. बी. सौदागर, पं. स. सदस्य तानाजी जोगदंड, बाळासाहेब जाधव, सरपंच पती गंगाराम धायगुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. गोरे म्हणाले, शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागात असे उद्योगसमूह उभा राहिल्यास शेतकरी समृद्ध होतील, असे मत व्यक्त केले. यावेळी संचालक मंडळ नितीन गोरे, राहुल गोरे, धीरज काकडे, डिंगाबर शिंदे, राजाभाऊ पारेकर, पृथ्वीराज गोरे आदी संचालकांचे सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी सोयाबीन विक्री साठी आलेले शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अविनाश गोरे, विकास गोरे, शिवाजी गोरेमाळी, सचिन गोरे, प्रमोद शिंदे, अविनाश काकडे, पवन आपिटे, धम्मा गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

प्रास्ताविक बालासाहेब सुवर्णकार यांनी करतांना कंपनीच्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम सुवर्णकार यांनी तर साईनाथ जोगदंड यांनीआभार व्यक्त केले.

Post a comment

0 Comments