बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सोडणार बस. एसटीचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांची माहिती.

बंदच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सोडणार बस.
एसटीचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांची माहिती.

औरंगाबाद - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाना पाठींबा दर्शवण्यासाठी मंगळवारी दि.8 विविध संघटना व राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली आहे. 

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर व जिल्ह्यात प्रवाशांच्या प्रतिसाद पाहून एसटी आपल्या बसेस सोडणार आहे, अशी माहिती एसटीचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकर्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी देशव्यापी भारत बंदची हाक दिलेली आहे. या संपात विविध संघटना व राजकीस पक्ष सहभागी होणार आहेत. 

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एसटीच्या स्थानिक प्रशासनाने माहिती घेऊन त्या-त्या मार्गावरची वाहतूक सुरू ठेवायची की नाही, याबाबतचा निर्णय घ्यायचे आदेश दिले आहेत. 

त्यानुसार, औरंगाबाद शहर व जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक सिया यांनी दिली. तसेच औरंगाबाद येथील मध्यवर्ती, सिडको बसस्थनाक व ग्रामीण येथील आगार व्यवस्थापकांनी आगाराच्या सुरक्षेसाठी संबंधीत पोलिस ठाण्यात अर्ज देखील केले असल्याची माहिती सिया यांनी दिली.

Post a comment

0 Comments