पुण्याच्या वाढत्या गर्दीमुळे पुरंदरला होणार आंतराष्ट्रीय विमानतळ ? केंद्र सरकारकडे प्रस्ताव ठेवल्याची शरद पवारांनी दिली माहिती.

पुण्याच्या वाढत्या गर्दीमुळे पुरंदरला होणार आंतराष्ट्रीय विमानतळ ?
केंद्र सरकारकडे प्रस्ताव ठेवल्याची शरद पवारांनी दिली माहिती.

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षणमंञी राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा भार वाढला आहे. त्यामुळे, महाराष्ट्र सरकारने पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्तवा ठेवला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी टि्वटद्वारे दिली आहे.

पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिलाय. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. @rajnathsingh यांची भेट घेतली. pic.twitter.com/I4DoxjP27t

— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 9, 2020
[removed][removed]

शरद पवार यांनी टि्वटमध्ये म्हंटले आहे की, पुणे शहराच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतुकीचा वाढता भार असल्याने पुरंदर इथे नवा विमानतळ स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने दिला आहे. प्रस्तावित विमानतळाचे काम जलदगती व प्राधान्यक्रमाने सुरू व्हावे, यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची भेट घेतली, असे पवार यांनी म्हंटले आहे. 

Post a comment

0 Comments