सततची नापीकी व कर्जबाजारास कंटाळून, गळफास घेऊन युवक शेतकऱ्यांची आत्महत्या.

सततची नापीकी व कर्जबाजारास कंटाळून, गळफास घेऊन युवक शेतकऱ्यांची आत्महत्या. 

उमरी : प्रतिनिधी उमरी तालुक्यातील कुदळा या गावच्या युवक शेतकऱ्यांने केली गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपवले.
सतत शेतात कष्ट करत असलेल्या तुकाराम (श्याम) दत्तराम जाधव रा.कुदळा.वय वर्ष  34 यांनी सततची नापीकी व कर्जबाजारी झाल्यामुळे दि.0 9 डिंसेबर रोजी बुधवारी सकाळी ठिक  7.00 वाजता त्यांच्या स्वत:च्या शेतामधील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जिवन यात्रा संपवले.

उमरी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम व गणपत सरोदे, तलाठी मंगरूळे. यांनी घटनास्थळी भेट देवून या घटनेची माहिती घेतली तुकाराम (श्याम) चा मॄतदेह उमरी ग्राॅमीण रूग्णालयात आणून शवविच्छेदना नंतर दुपारी 2.00वाजता. पोलीसानी मॄतदेह ताब्यात दिला. मॄतदेहाला कुदळा गावी 3.00.वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. कुदळा गावावर शोककळा पसरली होती.

पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व गणपत सरोदे करत आहेत. आत्महत्या शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.

Post a comment

0 Comments