नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडाआरोपीच्या कोठडीत चार डिसेंबरपर्यंत वाढ.

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा
आरोपीच्या कोठडीत चार डिसेंबरपर्यंत वाढ.

औरंगाबाद - सुशिक्षीत बेरोजगार तरूणांना सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणार्या आरोपीच्या पोलीस कोठडीत चार डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे/तांबडे यांनी सोमवारी दि.30 दिले. अशोक साहेबराव वैद्य (29, रा. जमनज्योती, हर्सुल) असे आरोपीचे नाव असून त्याला 24 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली.
प्रकरणात योगेश नामदेव गोरे (33, रा. प्लॉट नं. 184 पुष्पक गार्डन चिकलठाणा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, योगेश व आरोपी अशोक वैद्यची ओळख दिपक शहाणे मार्फत झाली. आरोपीने योगेश व अक्षय गायके (रा.औरंगाबाद) यादोघांना रेल्वेत टिसीची नोकरील लावुन देण्याचे आमिष दाखवित त्यासाठी अकरा लाखांची मागणी केली. त्यानुसार दोघांनी प्रत्येकी दहा लाख रुपये दिले. 26 फेबु्रवारी 2019 रोजी योगेश व अक्षयला टी सी च्या नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर आरोपीने त्यांना ट्रेनिंगसाठी सासाराम (बिहार) येथे पाठविले. मात्र संशय आल्याने त्यांनी आरोपीकडून पैसे परत करण्याची मागणी केली. तेंव्हा आरोपीने चार लाख रुपये परत केले मात्र उर्वरित पैसे देण्यास टाळटाळ करु लागला.

आरोपीने युथ असेशिएशन युथ इंटरनॅशनल स्काऊट अ‍ॅण्ड गाईड या संस्थेच्या माध्यमातून नोकरी लावुन देण्याचे आमिष दाखवून नांदेड, मालेगाव, चाळीसगाव, सोलापुर व जालना जिल्ह्यात अनेक सुरिक्षीत बेरोजगार तरुणाना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. प्रकरणात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

रेल्वे मंत्रालयापर्यंत जाणार तपास
सहाय्यक सरकारी वकील नितीन जाधव यांनी आरोपीच्या संस्थेचा सदस्य असलेला योगेंद्र कुमार (रा. दिल्ली) याने योगेश गोरे व अक्षय गायके यांचे नियुक्तीपत्र आरोपीकडे दिल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीने रेल्वे मंत्रालयात कोणाची भेट घालून दिली याचा तपास करणे आहे. आरोपीने सांगितल्या प्रमाणे दिल्लीतील मनिष कुमार, रंजित कुमार (ममता देवी) यांचा गुन्ह्यात सहभाग आहे याचा तपास करणे आहे. त्यामुळे आरोपीस न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली.

Post a comment

0 Comments