उत्तरेतील थंडीच्या लाट महाराष्ट्रच्या दिशेने !राज्यात थंडी वाढण्याची शक्यता.

पुणे, दि. १९ डिसेंबर : उत्तर भारतात असलेल्या थंडीच्या लाटेचे काहीसे प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागले आहेत. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागात ऊब मिळविण्यासाठी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. येत्या काळात आणखी थंडी वाढणार असल्याने किमान तापमानात चांगलीच घट होईल, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांत झालेल्या पावसामुळे हवेत अजूनही आर्द्रता आहे. यामुळे मध्यरात्रीनंतर चांगलाच गारठा वाढत आहे. यामुळे पहाटे चांगलेच धुके पडत आहे. सध्या राज्यात कोरडे हवामान असल्याने थंडी वाढत असल्याने किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया, नागपूर येथे १३ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

विदर्भात तापमान घटले...
शुक्रवारी (ता. १८) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २१.२ (३), अलिबाग २०.७ (२), ठाणे २१, रत्नागिरी २१ (१), डहाणू १९.४ (१), नगर १५.७, पुणे १३.८ (३), जळगाव १५.६ (४), कोल्हापूर १८.६ (४), महाबळेश्‍वर १४.४ (१), मालेगाव १५.६ (४), नाशिक १५.१ (५), निफाड १४.२., सांगली १७ (३), सातारा १५.३ (३), सोलापूर १७.९ (३), औरंगाबाद १५.९ (५), बीड १८.३ (५), परभणी १५ (२), परभणी कृषी विद्यापीठ १३.५, नांदेड १८ (६), उस्मानाबाद १८ (५), अकोला १५.६ (३), अमरावती १६.७ (२), बुलडाणा १५.८ (२), चंद्रपूर १८.२ (५), गोंदिया १३ (१), नागपूर १३, वर्धा १६ (३), यवतमाळ १५.५ (१)
 
Post a comment

0 Comments