लोह्याच्या जाहीर कार्यक्रमात खिलारे यांचा आमदार शिंदे गटात प्रवेश
लोहा, दि. ११ शुक्रवार : शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजीराव खिल्लारे यांनी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून लोह्यातील खरेदी-विक्री संघाच्या कार्यक्रमात आमदार शामसुंदर शिंदे यांना जाहीर समर्थन दिले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते बालाजी खिलारे यांचा आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला व त्यांचे स्वागत केले .लोहा तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात बालाजी खिलारे यांचे मोठे योगदान आहे ,बालाजी खिल्लारे यांच्या मातोश्री राहीबाई खिल्लारे या लोहा नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका आहेत ,एक शांत संयमी नेतृत्व म्हणून बालाजी खिलारे यांची तालुक्यात ओळख आहे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बालाजी खिल्लारे  यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांना लोह्याच्या कार्यक्रमात जाहीर समर्थन दिल्याने लोहा तालुक्यातील राजकारणात रंग चढले ची तालुक्यातील नागरिकात जोरदार चर्चा आहे. बालाजी खिल्लारे यांच्या जाहीर समर्थनाने जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, विक्रांत दादा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ज्ञानेश्वर चौडे, लोहा खरेदी-विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर, उपसभापती श्याम आण्णा पवार आदींनी बालाजी खिलारे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a comment

0 Comments