घातापाताचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये घातापाताचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे.  दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर साठा जप्त केला आहे. हे सर्व दहशवादी इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "दिल्लीमधील शकरपूर परिसरात झालेल्या गोळीबारानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामधील दोन जण पंजाब तर तीन जण काश्मीरचे आहेत. शस्त्र तसेच इतर साहित्य देखील जप्त करण्यात आलं आहे". या सर्व दहशतवाद्यांना आयएसआयचा पाठिंबा होती अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे

Post a comment

0 Comments