किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून हत्या

डोंबिवली : किरकोळ वादातून एका व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतंच समोर आली आहे. या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे आजदे गावातील पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसीमध्ये एक खाजगी कॅन्टीन आहे. या कॅन्टीनमध्ये काही तरुण पार्टी करण्यासाठी बसले होते. यात पेंडसेनगर परिसरात राहणारा शशांक महाजन त्याच्या एका मित्रासोबत पार्टी करायला बसला होता. या दरम्यान एका तरुणाशी काही कारणात्सव वाद झाला.
हा वाद निवळल्यानंतर शंशाक घरी जाण्यासाठी निघाला. त्याने घरी जाण्यासाठी ओला अॅपवरुन गाडी बूक केली. मात्र ही गाडी वेळेवर न आल्याने तो आणि त्याचा मित्र पायी घरी जाण्यासाठी निघाले.
या दरम्यान ज्या तरुणांसोबत शशांकचा वाद झाला ते सर्वजण लाल रंगाच्या गाडीत बसून त्याचा पाठलाग करु लागले. त्याचवेळी शशांकला वाटले ती त्याने बूक केलेली कार येत आहे. त्यानंतर शंशाकने ती गाडी थांबवल्यानंतर ते तरुण कारमध्ये बसले होते.
या तरुणांनी शशांक आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. त्यानंतर शशांकला रस्त्यावर पाडले आणि त्यानंतर चारचाकी गाडी त्याच्या डोक्यावर घातली. त्यानंतर ते सहाही जणांनी त्याच गाडीतून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस अधिकारी संतोष डांबरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. काही सोय नसताना पोलिसांनी जखमी शशांकला पोलिसांनी आपल्या गाडीत टाकले. त्यानंतर त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र गाडी रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच शशांकचा मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments