उद्या दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक.

उद्या दिल्लीत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक.

कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवण्यासाठी उद्या दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक होणार आहे, असे वृत्त आहे.

नवी दिल्ली : केंद्राच्या नव्या तिन कृषी कायद्या विरोधात मागील 13 दिवासांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 

नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज भारत बंदची घोषणा केली आहे. या बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमिवर कृषी कायद्याबाबत विरोधकांची रणनिती ठरवण्यासाठी उद्या दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक होणार आहे, असे वृत्त आहे. या बैठकीत भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार आहे.
या बैठकीनंतर शरद पवार अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्याची शक्याता आहे. 
शरद पवार संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असून यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते.
या भेटीत शरद पवार राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणार आहे. राष्ट्रपतींना अधिकार असतील तर ते प्रश्न सोडवतील. 

शरद पवार राष्ट्रपतींची भेट घेत आहेत. 
त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन कोणाला भेटायची गरज नाही, शरद पवारच महाराष्ट्राची भूमिका मांडतील, असे शिवसेना नेते सजंय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Post a comment

0 Comments