एसबीआयच्या मुख्य शाखेसमोर भाजपचे आज उपोषण.


औरंगाबाद, दि.२१ डिसेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया माजलगाव शाखेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मुख्य मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिडको येथील बँकेच्या क्षेत्रीय अधिकारी शाखेसमोर मंगळवारी( दि. २२) सकाळी ११ वाजता उपोषण करण्यात येणार आहे.
माजलगाव येथील एसबीआय शाखेत माफी मिळालेल्या सुमारे बाराशे लाभार्थी शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारण्यात आले आहे. पीक कर्ज कोणत्या कारणाने नाकारले याची माहिती देण्यात आली नाही. हे विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाचे कारण सांगून भेटण्यास टाळाटाळ करण्यात येते. बँकेच्या गेटसमोर शेतकऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागते. हेच काम एजंटच्या माध्यमातून केल्यानंतर तत्काळ काम होतात. शेतकऱ्यांबरोबरच पेन्शन धारक वयोवृद्धांची हेळसांड बँकेतील अधिकारी, कर्मचारी करतात. गुराळासाठी कर्ज मंजूर झालेले परंतु बँकेची पॉलिसी न घेतल्यामुळे वर्षभरापासून कर्ज देण्यात आलेले नाही. शाखाधिकारी संदीप कुमार व बालाजी गोपडवाड यांची चौकशी करून बडतर्फ करावे या मागणीबरोबरच शेतकऱ्यांना पीक कर्ज माफिसाठी उपोषण करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माजलगाव तालुकाअध्यक्ष अरुण माणिकराव राऊत यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments