गंगापूर शहरासह तालुक्यात भारत बंद ला विविध संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच व्यापारी, आदिंचा पाठिंबा.


गंगापूर, दि.८ मंगळवार : बारा दिवसांपासून सुरू असलेल्या दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी गंगापूर तालुक्यातील काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. ८ डीसेबंर रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, चौकात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,एम आय एम,वंचित बहुजन आघाडी,प्रहार शेतकरी संघटना,मनसे शेतकरी संघटना,समाजवादी पार्टी,रिपब्लिकन सेना,जमाते उलमा ए हिंद,वकिल संघ,व्यापारी महासंघ,डॉक्टर असोसिएशन,संस्था,मित्र मंडळ, फळ विक्रेता , तालुका कृती समिती,
विविध पक्ष,संघटना,  व्यापारी,सीमा नायक, अमीना शेख, बुरान, आदींच्या हस्ते बळीराजाचे पूजन करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली
यावेळी गंगापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a comment

0 Comments