एका खुंब्यात शेतकरी बैलाला सरळ करतो, हे तर केंद्रांतील सरकार आहे: गुलाबराव पाटील


जळगाव, दि.७ रविवार : शेतकऱ्यांची ताकद मोठी आहे, तो आपल्या एका खुंब्यात बैलाला सरळ करू शकतो, त्यामुळे केंद्रांतील सरकारला ते सरळ करतील, असा सणसणीत टोला राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रांतील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला लगावला आहे. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जळगाव येथील रेल्वे स्थानक परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले, "आज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन आहे. 
आजच्या या दिवशी आपल्या एवढेच म्हणावयाचे आहे की  डॉ.आबेंडकर यानी या देशातील शेतकरी,जनता यांच्यासाठी कायदे बनविले मात्र आज त्याच शेतकऱ्यांना अडचण येत आहे. त्यांनी केलेल्या या कायद्याच्या आधारावर केंद्रांतील सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्‍न तातडीने सोडवून त्यांना न्याय द्यायला हवा होता. मात्र आज  त्याच कायद्याची पायमल्ली करण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू आहे, तब्बल ५२ टक्के रोजगार देणारी फॅक्टरी शेतकरी आहे.त्याच शेतकऱ्यावर आज केंद्र सरकार अन्याय करीत आहे.हे मोठे दुर्दैव आहे,''शेतकरी सरकारला दिल्लीच्या तख्तावरून खाली उतरवेल
केंद्रांतील सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करून ते म्हणाले, "केद्रांतील सरकार शेतकऱ्यावर योजना करून अन्याय करीत असेल तर दिल्ली काही लांब नाही, अजूनही तीन वर्षे बाकी आहेत.देशातील याच शेतकऱ्यांनी त्यांना दिल्लीच्या तख्वावर बसविले आहे, त्याच तख्तावरून त्यांना खाली उतरविण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे,त्यामुळे शेतकऱ्यांना आडव करू नका, तो तुम्हाला आडवं करून टाकेल ज्या बुरूजावर बसविले आहे, तोच तो ढासळून टाकेल. शेतकरी एका खुंब्यात बैलाला सरळ करू शकतो हे तर सरकार आहे. त्यांना या केंद्रांतील सरकारला सरळ करण्यास फार वेळ लागणार नाही. केंद्रांतील भाजप सरकारनेही हे लक्षात घ्यावे,''

Post a comment

0 Comments