पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवून दिली- रोहित पवार

मुंबई : राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह  हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर  मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी ठरलाय.
पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गुलाल उधळला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीचे अभिनंदन केले आहे, तसेच भाजपलाही जोरदार टोला लगावला आहे. रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे, त्यामध्ये म्हटलं आहे की, “भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली आहे.

Post a comment

0 Comments