प्रतिबंधित प्लास्टिक वाहतूक करणार्‍या वाहनास अल्पदंड. माल जप्त न करता कर्मचार्‍यांनी सोडून दिले वाहन.

प्रतिबंधित प्लास्टिक वाहतूक करणार्‍या वाहनास अल्पदंड.
माल जप्त न करता कर्मचार्‍यांनी सोडून दिले वाहन.

पैठण - एक वर्षापूर्वी राज्य शासनाने पर्यावरणास र्‍हास ठरणार्‍या प्लास्टिक वस्तूवर बंदी केली होती. यासाठी राज्य शासनाने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना मात्र दुसरीकडे भलतेच प्रकार घडत आहेत. जवळपास 500 किलो प्रतिबंधीत प्लास्टिक वाहतूक करणार्‍या वाहनातील माल जप्त न करता नाममात्र दंडाचे शुल्क कर्मचार्‍यांनी तोडीपाणी करत वाहन सोडून दिल्याची चर्चा आहे.

पैठण नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांनी प्रतिबंधित प्लास्टिकने भरलेला छोटा हत्ती फक्त 5 हजार रुपये नाममात्र दंड आकारून सोडून देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात नगरपरिषदच्या प्लास्टिक विरोधी पथकातील कर्मचारी व अधिकारी यांनी चांगलेच हात धुवून घेतल्याची चर्चा व्यापार्‍यात सुरू आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार सदर वाहनात जवळपास 500 किलो प्लास्टिकचा माल आल्याचे सांगण्यात येत आहे. इतकी मोठी कारवाई असताना नाममात्र दंड आकारत माल जप्त न करता वाहन सोडून देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवार रोजी प्लास्टिक वस्तूने खचाखच भरलेला छोटा हत्ती (क्र.एमएच 14 ईम 4418) हा पैठण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील व्यापार्‍यांना बंदी असलेले प्लास्टिक वस्तू पुरवठा करण्यासाठी आला होता.
प्लास्टिक विरोधी पथकाचे प्रमुख मुकुंद महाजन यांच्या नजरेस तो पडला.
तत्काळ ही बाब महाजन यांनी उपमुख्यधिकारी अब्दुल सत्तार कळवली. उपमुख्यधिकारी अ. सत्तार हे अन्य कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. प्लास्टिकने भरलेले वाहन जप्त करीत संबधित वाहनास जप्त करून मालासह न. प. कार्यालयात जमा केले मात्र एक तासानंतर सदर वाहन हे प्रतिबंधीत मालसह शहरवासीयांना माघारी जाताना दिसले. त्यामुळे या कारवाईबाबतीत उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे. 
व्यापार्‍यांशी आर्थिक तडजोड करून वाहन सोडणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची सखोल चौकशी करून निलंबन करण्याची मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे.


Post a comment

0 Comments