राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात फोन करून तुमचे कार्यालय तोडून टाकू. जाळून टाकू, अशी धमकी त्यांना दिली. या धमकीनंतर त्यांच्या कार्यालयात एकच खळबळ उडाली. चाकणकर या कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी हा प्रकार चाकणकर यांना फोन करून सांगितला. त्यानंतर चाकणकर यांनी थेट सिंहगड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

Post a comment

0 Comments