ॲड. बाळासाहेब आंबेडकरांवर सोशल मीडियावर टाकला आक्षेपार्ह मजकूर!! आंबेडकरी कार्यकर्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.


तिवसा, दि. २६ डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जबाबदार पदाधिकारी असलेल्या स्नेहल कांबळे यांनी फेसबुकवरून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक तथा अपमानजनक मजकूर पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून करवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा अपमान स्नेहल कांबळे या महिलेने केला आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे देशातील समस्त बहुजन समाजाचे नेते आहे. त्यांच्याबद्दल जनमानसात अत्यंत आदर आहे. या पोस्टमुळे वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी कार्यकर्तांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
स्नेहल कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून करवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका तिवसाच्यावतीने करण्यात आली आहे. तक्रार सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवतेसह सतीश यावले, तालुका अध्यक्ष सुमित सोनोने, शहर अध्यक्ष संदीप मकेश्वर, प्रवीण निकाळजे, राहुल गोपाळे, बबलू मुंद्रे, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, धनंजय आसोडे, भाष्कर आसोडे, सम्यक हगवने, रोशन खडसे आदी उपस्थित होते.


स्नेहल कांबळे या ओबीसी महासभाच्या अध्यक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहे. कांबळे यांनी २५ डिसेंबर रोजी फेसबुकवरून वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. ‘राष्ट्रीय सेवा संघ यांचे दलाल’ अशा शब्दात टीका केली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत स्नेहल कांबळे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

Post a comment

0 Comments