शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीची धरणे.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीची धरणे.

केंद्र सरकार या आंदोलनाचा दडपण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. 
मात्र या आंदोलनाने आता उग्र रूप घेतले आहे. या आंदोलनाच्या समर्थनाथ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही शनिवारी दि.5 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत पाठिंबा दर्शवला.

औरंगाबाद : शेतकर्‍यांच्या हिताविरोधात केंद्र सरकारने आमलात आणत असलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकर्‍यांनी मोठे आंदोलन छेडले आहे. 

केंद्र सरकार या आंदोलनाचा दडपण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. मात्र या आंदोलनाने आता उग्र रूप घेतले आहे. या आंदोलनाच्या समर्थनाथ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही शनिवारी दि.5 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत पाठिंबा दर्शवला.
राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दडपू पाहणार्‍या केंद्र सरकारचा निषेध केला. 
धरणे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत शेतकरी करीत असलेल्या आंदोलनाला केंद्र सरकार गांर्भीयाने घेण्यास तयार नाही. 

मागील आठवडाभरापासून राजधानी दिल्लीत कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र सरकार या आंदोलनाची दखल घेण्याऐवजी ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदे त्वरीत रद्द करावे आणि शेतकर्‍यांना न्याय द्यावा. या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असून याची दखल प्रशासनाने घेऊन सरकारपर्यंत पोहचवावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, जिल्हाध्यक्ष विजयराव साळवे, सलीम शेख आदींची नावे आहेत.

Post a comment

0 Comments