अशोक चव्हाणांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती जर 25 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर 26 जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने यापुढील लढाई रस्त्यावर उतरुन लढू, अशी भूमिका स्पष्ट केली. मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते. 
मागील मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजासाठी राज्य सरकारने EWS च्या आरक्षणाची घोषणा केली होती. EWS चं आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजीतल रोष कमी होईल, असा राज्य सरकारचा मानस होता. मात्र सरकारच्या निर्णयानंतर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. “EWS आरक्षणासाठी आम्ही लाखोंचे 58 मोर्चे काढले नव्हते किंबहुना आमच्या 42 बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करलं नाही. जर 25 तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर 26 तारखेपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि या सरकारमधील मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही”, अशी आक्रमक भुमिका रमेश केरे पाटील यांनी मांडली.

Post a comment

0 Comments