दोन दिवसांपूर्वी प्रवेश आणि त्याच राष्ट्रवादीत का विरोध?

इचलकरंजी : राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधून दोन दिवस उलटत नाहीत, तोच माजी आमदार राजीव आवळे यांना विरोध होताना दिसत आहे.
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राजीव आवळे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळी उडालेल्या ठिणग्यांचं उत्तर विरोधाने दिलं जात आहे. 
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता.

Post a comment

0 Comments