डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन.औरंगाबाद, दि.६  रविवार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सकाळी ८ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, अभिवादन करण्यात आले. यावेळी  प्रकुलगुरु डॉ.शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य फुलचंद सलामपुरे यांच्यासह अधिष्ठाता डॉ वाल्मीक सरवदे, डॉ.भालचंद्र वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे,  विकास
संचालक डॉ.मुस्तजिब खान, रासेयो र्सचालक डॉ टी आर पाटील
यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.महेंद्र भवरे यांचे सकाळी साडेदहा वाजता व्याख्यान यानंतर मुंबई विद्यापीठातील मराठी विभागातील प्राध्यापक, ज्येष्ठ समीक्षक, कवी महेंद्र भवरे यांचे ऑनलाइन व्याख्यान सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. बाबासाहेबांवर विपुल प्रमाणात कथा,कविता, कादंबरी, नाटक, गीते व वैचारिक लेखन झालेले आहे. या अनुषंगाने 'कवितेतील बाबासाहेब' या विषयावर डॉ. भवरे हे आपले विचार मांडतील. अध्यक्षीय समारोप मा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले हे करणार आहेत. पाहुण्यांचा परिचय इंग्रजी विभागप्रमुख , कवी डॉ उत्तम अंभोरे हे करणार आहेत.

………

Post a comment

0 Comments