धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी, काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव.

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी, काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव.

धुळे - धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमरिश पटेल विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अभिजित पाटलांचा पराभव केलाय. अमरीश पटेल यांना 332 तर अभिजित पाटील यांना केवळ 98 मते मिळाली आहेत. त्यामुळे अमरीश पटेलांचा विजय झाला, त्यांची अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.

अमरिश पटेल विरोधकांची 115 मते फोडण्यात यशस्वी ठरले आहेत. भाजपाचे 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदारांनी मतदान केले होते. काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचे संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना केवळ 98 च मते मिळाली. आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलेय. महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 1 डिसेंबरला 99 टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणी झाली असता भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत.

Post a comment

0 Comments