विभक्त विवाहितेवर बळजबरीने अत्याचारपसार आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.

विभक्त विवाहितेवर बळजबरीने अत्याचार
पसार आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.

औरंगाबाद : नारेगावातील विभक्त विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून अत्याचार करुन तिचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात आरोपी अशोक सुर्यभान विधाते (रा. राजेंद्रनगर, नारेगाव), सय्यद शकील सय्यद सादीक (33, रा. मिसारवाडी) या दोघांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.एम.एस. देशपांडे यांनी फेटाळला. या प्रकरणात 30 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. त्यानुसार ती पतीपासुन विभक्त होउन महालपिंप्री येथे आई वडीलोंबत राहते. 

नारेगाव रोडवर तिचे कापड दुकान आहे. तेथे तिची आरोपी विधाते याच्याशी ओळख झाली. 25 एप्रिल 2016 रोजी दुपारी विधातेने तिला फोन करुन नातेवाईकांच्या घरी बोलावले. तेथे गेल्यावर ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण आयुष्यभर सोबत राहू. तू माझ्या सोबत शारिरीक संबंध ठेव’, असे म्हणून विधातेने तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबध ठेवले. त्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी आरोपीने पीडितेला पुन्हा रुमवर बोलावले. संबंध ठेवल्यानंतर तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली. तेव्हा पीडितेने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी विधातेने संबंधाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 

त्यानंतर पीडितेला विधातेचा मित्र सय्यद शकिल हा भेटला त्याने विधातेने जरी तुझे अश्लिल व्हिडीओ डिलीट केले. तरी ते सर्व व्हिडीओ माझ्या मोबाईलमध्ये आहेत. मी ते सर्वांना दाखवतो’ अशी धमकी दिली. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासुन आरोपी पसार आहेत. दरम्यान गुन्ह्यात अटक होउ नये, यासाठी आरोपी अशोक विधाते व सय्यद शकील या दोघांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. 

अर्जाच्या सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता मधुकर आहेर यांनी आरोपीकडून मोबाइल जप्त करणे आहे. आरोपी पिडिता व साक्षीदारांवर दबाव आणुन पुरावे नष्ट करु शकतो. तयामुळे आरोपीच्या जामीनीला विरोध केला. सुनवाणीअंती न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.

Post a comment

0 Comments