खड्ड्यात दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू, निधोना-बाबरा रस्त्यावरील घटना.

खड्ड्यात दुचाकी आदळून महिलेचा मृत्यू, निधोना-बाबरा रस्त्यावरील घटना.

निधोना :- निधोना-बाबरा रस्त्यावर पवारवस्ती लगत मोठ- मोठी खड्डे पडलेले आहेत. पडलेले खड्डे बुजवण्यासाठी बर्‍याच दिवसापासून लोकांकडून मागणी होत आहे. गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून महिला रस्त्यावर पडली होती. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. 
औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दि. 6 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. निधोना-बाबरा या रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता दुरूस्तीची मागणी होऊनही संबंधित गुत्तेदार व विभागाने याकडे दुर्लक्ष केले. 

वावना येथील भागुबाई भानुदास जाधव (वय-60) या दि.2 डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता नातलगाबरोबर मोटारसायकलवर बाबराकडून घराकडे येत होत्या. पवार वस्ती लगत रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने त्या खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. 

दि.6 डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्याच्यावर दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परीवार आहे. वायरमन सोमीनाथ जाधव यांच्या त्या मातोश्री होत.

Post a comment

0 Comments